Akurdi : प्रसिद्ध लेखक चेतन भगत बुधवारी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद 

Famous writer Chetan Bhagat will interact with students on Wednesday.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज-  ‘कोरोना पलीकडे नोकरीची नवी क्षितिजे’ या विषयावर प्रसिद्ध लेखक चेतन भगत विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहे. डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी तर्फे आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलणार आहेत.

सर्वांसाठी खुला असणार्या या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.15) 11 ते 12.30 या वेळेत करण्यात येणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कॅम्पस तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याची माहिती डॉ. शलाका पारकर यांनी दिली.

‘कोरोना पलीकडील करिअरची नवी क्षितिजे’ तसेच कोविड -19 च्या परिस्थितीत आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोविड -19 नंतरच्या नोकरीसाठी योग्य कौशल्य निर्माण करणे व त्यासाठीचे मार्ग आणि साधने ओळखणे यावर भर दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.