Kadachiwadi : अंगणवाडीमधील बालचमुंनी घेतला फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा आनंद

एमपीसी न्यूज- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त कडाचीवाडी येथील गावठाण हद्दीमधील अंगणवाडीत बालचमुंनी विविध वेशभूषा परिधान करून प्रेक्षकांची मने जिंकली.

_MPC_DIR_MPU_II

3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठी विविध खेळांचे व वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व स्पर्धांचे आयोजन अंगणवाडी शिक्षिका शैला मेदनकर व कीर्ती कोतवाल यांनी केले. या प्रसंगी कडाचीवाडी गावचे सरपंच महादेव बचुटे, उपसरपंच गणेश पऱ्हाड, रामचंद्र कड, किरण कड, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक निवृत्ती भुकन व राळे सर, सर्व पालक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.