Farewell Match to Dhoni : बीसीसीआय धोनीसाठी करणार एका फेअरवेल मॅचचे आयोजन

धोनीसाठी आयपीएलनंतर एक सामना आयोजित केला जाईल. धोनीचा सन्मान करण्यासाठी हा सामना असणार आहे.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी यांनी 15 ऑगस्ट रोजी सांयकांळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्याच्यासाठी फेअरवेल मॅचचे आयोजन करण्याची मागणी चाहते करत आहेत. त्यानुसार, धोनीसाठी एका फेअरवेल मॅचचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बीसीसीआय अधिकाऱ्यांने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट बोर्डानं धोनीसाठी एका फेअरमॅचचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, ही मॅच धोनीशी चर्चा केल्यानंतर आयोजित करण्यात येईल.

सध्या धोनी आयपीएल खेळण्यासाठी युएइला रवाना होईल, त्यानंतरच याबाबत चर्चा केली जाणार आहे.

सध्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन केले गेलेले नाही. त्यामुळे धोनीसाठी आयपीएलनंतर एक सामना आयोजित केला जाईल. धोनीचा सन्मान करण्यासाठी हा सामना असणार आहे.

धोनीनं सामन्यासाठी नकार दिला तरी, धोनीसाठी एक खास फेअरवेल नक्कीच होणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

धोनीनं निवृत्ती जाहीर केल्यानंतर माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी धोनीसाठी एका सामन्याचे आयोजन करावे, अशी मागणी केली होती.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.