Farmer Agitation : संत बाबा राम सिंग यांची गोळी झाडून आत्महत्या

एमपीसीन्यूज ; कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या 20 दिवसांपासून शेतकरी दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सहभागी असलेले संत बाबा राम सिंग यांनी आज, बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

_MPC_DIR_MPU_II

बाबा राम सिंग हे करनालमधील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येनंतर शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.