Chakan : धरणग्रस्त शेतकरी पाण्यात बुडाला 

खेड तालुक्यातील घटना ; जलसमाधी घेतल्याचा प्रकल्पग्रस्तांचा दावा 

(अविनाश दुधवडे) 

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील भामाआसखेड धरणात एक शेतकरी बुडाल्याची घटना शनिवारी (दि.८) दुपारी समोर आली असून संबंधित शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी होता. त्याने धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे जलसमाधी घेतल्याचा दावा भामाआसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, घटनास्थळी एनडीआरएफचे पथक पाचारण करण्यात आले असून सायंकाळी उशिरापर्यंत पाण्यात शोधकार्य सुरु होते. ज्ञानेश्वर शांताराम सुतार उर्फ गुंजाळ असे संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे. 

दरम्यान, धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मागील काही वर्षात सातत्याने वेगवेगळी आंदोलने करून आपला रोष व्यक्त केला आहे.
मात्र, ढिम्म शासनाने या आंदोलनाची फारशी दखल घेतलेली नाही. धरणग्रस्तांचे पुनर्वसन, लाभ क्षेत्रातील जमिनींवरील शिक्के काढणे या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्या अद्यापही जैसे थे आहेत. त्यामुळेच संबंधित शेतकऱ्याने याच धरणाच्या पाण्यात उडी घेतल्याचे अन्य प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संखेने जमले असून तणावपूर्ण शांतता आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.