Farmers Agitation News : प्रकाश सिंग बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार केला परत

एमपीसीन्यूज : कृषी कायद्याच्या निषेधार्थ सप्टेंबरमध्ये एनडीएमधून वेगळे होण्याचा निर्णय घेणाऱ्या अकाली दलाचे नेते व पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केंद्र सरकारच्या कृषी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ पद्मविभूषण पुरस्कार सरकारकडे केला परत केला. शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, तर कोणत्याही प्रकारचा सन्मान राखून ठेवण्यात अर्थ नसल्याचे त्यांनी पुरस्कार परत करताना मोदी सरकारला ठणकावून सांगितले.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचा आज, गुरुवारी आठवा दिवस आहे. केंद्राच्या कृषी विरोधी कायद्याच्या विरोधात उत्तरेतील शेतकऱ्यांनी रान पेटवले आहे.

या कायद्याला शिरोमणी अकाली दलाने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. या विरोधामुळेच शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर आता या पक्षाचे नेते व पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी त्यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार केला परत केला आहे. बादल यांना हा पुरस्कार 2015 मध्ये मिळाला होता.

प्रकाशसिंह बादल म्हणाले, ‘मी एवढा गरीब आहे की, शेतकऱ्यांसाठी अर्पण करण्याला माझ्याकडे काहीच नाही. मी जो काही आहे तो या शेतकऱ्यांमुळेच आहे. शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, तर कोणत्याही प्रकारचा सन्मान राखून ठेवण्यात अर्थ नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.