_MPC_DIR_MPU_III

Farmers Agitation News : ‘या’ आंतराष्ट्रीय सेलिब्रिटींनी दिला शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

एमपीसी न्यूज: शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी काटेरी तारा, खिळे, सिमेंटच्या भिंती बसवल्या आहेत. तेथील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. यावरून विरोध पक्ष सरकारला धारेवर धरत आहे.

_MPC_DIR_MPU_IV

दरम्यान, काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे भारतातील शेतकरी आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे.

कॅरिबियन पॉप स्टार असलेल्या रिहानाने काल शेतकरी आंदोलनाबाबतची ‘सीएनएन’ची बातमी ट्विटरवर शेअर केली. यावेळी तिने ‘आपण याबाबत का बोलत नाहीये’? असा प्रश्न विचारून #FarmersProtest असा हॅशटॅग वापरला आहे.

याचबरोबर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेदेखील सीएनएनचीच बातमी शेअर केली असून ‘भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांबरोबर आम्ही एकतेने उभे आहोत’ असे ट्विट केले आहे.

ग्रेटा थनबर्ग हिला अमेरिकन टाईम्स मासिकाने 2019 मध्ये ‘पर्सन ऑफ द इयर’ घोषित केले होते. तेव्हापासून ती चर्चेत आहे.

_MPC_DIR_MPU_II

रिहानाच्या या ट्विटला चांगलाच प्रतिसाद मिळत असून तिच्या फॉलोवर्समध्येही वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.