Delhi News : 8 डिसेंबरला मोदी सरकार विरोधात एल्गार पुकारत ‘भारत बंद’ची शेतकऱयांची हाक

एमपीसी न्यूज : घाईगडबडीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करा या मागणीवर शेतकरी ठाम असून, 8 डिसेंबरला मोदी सरकारविरोधात एल्गार पुकारत ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. बंदवेळी देशभरातील टोलनाक्यांवर आंदोलन करण्यात येईल.

mpcnews photos by Jignesh Mistry

तसेच दिल्लीकडे येणारे सर्व रस्ते अडवण्यात येतील असा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱयांच्या ठाम निर्धारामुळे मोदी सरकारला घाम फुटला आहे. आज शनिवारी केंद्र सरकार आणि शेतकऱयांमध्ये होणाऱया तिसऱया बैठकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

कडाक्याच्या थंडीतही शेतकरी मागे हटलेले नाहीत. दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी बांधव ठाण मांडून आहेत. देशभरात शेतकरी येथे येत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

  

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.