Pune : किसान, जवान, मजदूर संघ राज्यातील 48 जागा लढविणार

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांची घोषणा

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभेच्या राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर किसान, जवान, मजदूर संघ अशी आघाडी तयार केली आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तर, यंदा ‘अब की बार किसान’, जवान, मजदूर सरकार असणार आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी दिला.

यावेळी राज्यातील अनेक शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी रघुनाथ पाटील म्हणाले की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने देऊन सत्ता मिळवली. आता या सत्तेला पाच वर्षाचा काळ होत आला. तरी देखील कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाही. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्व सामान्य नागरिकासह शेतकऱ्याचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आता 2019 च्या लोकसभा निवडणूकीची तयारी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभेच्या जागी आम्ही निवडणूक लढविणार आहोत. त्यामध्ये सर्व घटकाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार असून भाजप युती आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक संघटनासोबत चर्चा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढविणार : रघुनाथ पाटील
    आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्ही कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार त्या प्रश्नावर रघुनाथ पाटील म्हणाले की, हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असून विजयी देखील होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1