CM Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला मोठं यश! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

एमपीसी न्यूज : अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात निघालेल्या लाँग मार्चला मोठे यश मिळाले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन केले. (CM Eknath Shinde) कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आदिवासींच्या वनजमिनीच्या दाव्याबाबत समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत माजी आमदार जीवा पांडू गावित आणि  आमदार विनोद निकोले यांचा समावेश असणार आहे. सरकार सगळ्याच मागण्यांबाबत सकारात्मक असून आता लाँग मार्च मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली होती की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देणार. त्यानंतर विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं होतं. राज्य सरकारने आज सानुग्रह अनुदानात वाढ केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचे 50 रूपये देण्याची घोषणा केली आहे.

 

आदिवासी जमिनी 4 हेक्टरपर्यंत वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करून कसणाऱ्याचे नाव लावावे, अपात्र दावे मंजूर करावे, ज्या जमिनीवर घर आहेत ती नियमित करावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. वन हक्काबाबत मुद्दे होते. अनेकांचे वन जमीन हक्काचे दावे प्रलंबित होते. (CM Eknath Shinde) आता, याबाबत एक समिती गठीत केली असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या समितीत किसान सभेचे नेते, माजी आमदार जे. पी. गावित आणि आमदार विनोद निकोले हे सदस्य असणार आहेत.

 

PMY: डुडुळगावच्या पंतप्रधान आवास योजनेत 31 कोटींचा घोटाळा, चौकशीसाठी प्रकरण ‘ईडी’कडे सोपविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

 

आशा मदतनीसांचे मानधन वाढवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 1500 रुपये प्रतिमाह वाढ करण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

 

राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हे आंदोलन सुरू होते. अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (CM Eknath Shinde) कंत्राटावर असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन, मानधन थेट त्यांच्याच बँक खात्यात देण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.