Chakan News : आदर्श गाव कान्हेवाडी येथे शेतकरी मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – किसान संपर्क अभियान अंतर्गत बॅंक ऑफ महाराष्ट्र पुणे पश्चिम विभाग व बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श ग्राम कान्हेवाडी तर्फे चाकण (ता.खेड) येथे शेतकरी व महिला बचत गट मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात सुमारे 100 शेतकरी व  बचत गट महिला व आजी माजी ग्रा. पं. सदस्य सहभागी झाले होते.

आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार यांचे अध्यक्षतेखाली व महाबॅंक विभाग प्रमुख जतिन देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला.

शेतकऱ्यांसाठीच्या विविध कर्ज योजना व महिला बचत गटांसाठीच्या विविध कर्ज योजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच फलोत्पादन,सुक्ष्म जलसिंचन,फुलशेती,यांत्रिक शेती, गटशेती तसेच केंद्र व राज्य शासनाच्या जीवन ज्योती,जीवन सुरक्षा,अटल पेन्शन योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जतिन देसाई, महाबॅंक विभागीय कृषी विभाग प्रमुख रोहन पानसरे, इंदोरी शाखा प्रमुख प्रमोद लोहार व कृषी अधिकारी उमेश चौधरी यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले व शंकांचे निरसन केले. यावेळी इंदोरी शाखेच्या वतीने शेतकरी, व्यावसायिक व उद्योजक यांना कर्जमंजुरी पत्रांचे वाटप जतिन देसाई यांचे हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक व स्वागत सरपंच भाऊसाहेब पवार यांनी केले तर सूत्रसंचालन ग्रामसेवक अरुण हुलगे यांनी केले.आणि आभार उपसरपंच राहुल येवले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.