Vadgaon Maval News : ‘माझा प्रभाग माझी जबाबदारी’ अंतर्गत शेतकरी आठवडे बाजार सुरु

एमपीसी न्यूज : माझा प्रभाग माझी जबाबदारी या संकल्पनेतून रविवार (दि 27) वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 मध्ये शेतकरी आठवडे बाजार सुरु करण्यात आला आहे.  माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका, विरोधी पक्षनेत्या अर्चना संतोष म्हाळसकर यांच्या पुढाकारातून सूर करण्यात आलेल्या  या आठवडे बाजारचे उद्घाटन माजी राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे, मावळ भाजपाचे प्रभारी  भास्कर अप्पा म्हाळसकर, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रविंद्र भेगडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

यावेळी मावळ भाजपा महिला अध्यक्षा  सायली बोत्रे, तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, गटनेते नगरसेवक दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर, ॲड. विजय जाधव, शाम ढोरे,  नामदेव वारींगे, रमण ढोरे, नितीन कुडे, शांताराम खोंडगे, गणेश गवारे, मनोज गवारे,नगरसेविका  सुनिता भिलारे, दिपाली मोरे, धनश्री भोंडवे,  वैशाली म्हाळसकर, ज्योती काटकर  तसेच उपस्थित सर्व वडगांव शहर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, प्रभागातील सर्व नागरीक महिला बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडगाव नगरपंचायत हद्दीतील शेतकरी व महिला बचत गट यांना देखील शेतकरी आठवडे बाजारामध्ये बसण्याची संधी उपलब्ध करून रोजगार मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मनोदय नगरसेविका अर्चना म्हाळसकर यांनी व्यक्त केला.

आठवडे बाजार चालु केल्याने 17 नंबर प्रभागातील सर्व महीला वर्गाने मनापासुन आभार मानले  व खुप चांगला उपक्रम चालु केल्याचे समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.