Maval News: शिक्षकांची जुनी पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही एकत्रित आंदोलन करता येत नसल्याने प्रत्येक शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी घरातच हे आंदोलन केले.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील शिक्षकांची जुनी पेन्शन नाकारणारी अधिसूचना रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने स्वगृही एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले.

शासनाने 10 जुलै 2020 ला प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेद्वारे 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक,  कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना नाकारून त्या अधिसूचनेवर हरकती आक्षेप मागितल्या होत्या.

त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कायदा व सेवाशर्थीतील तरतुदींनुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेले शिक्षक व कर्मचारी हे जुनी पेन्शन योजनेनुसार पेन्शन मिळण्यासाठी हक्कदार आहेत म्हणून ही अधिसूचना रद्द करण्याचे सुचविले होते.

परंतु, अजूनही ही अधिसूचना रद्द करण्यात आली नाही. म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यभर सोमवारी (दि.10) संपूर्ण दिवसभर अन्नत्याग आंदोलन केले.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही एकत्रित आंदोलन करता येत नसल्याने प्रत्येक शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी घरातच हे आंदोलन केले. यामध्ये पुणे विभागातील अनेक शिक्षक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचे दिसून आले.

याबाबत संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष भारत काळे यांना विचारले असता ते म्हणाले की, जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. शासनाचा 10 जुलै रोजी अधिसूचना काढून कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा हक्क हिरावून घेण्याचा डाव असून तो शिक्षक परिषदेच्या वतीने हाणून पाडण्यात येईल. ही अधिसूचना त्वरीत रद्द करावी अन्यथा यापुढील काळात शिक्षक व शिक्षकेत्तर बांधव रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्यवाह नरेंद्र वातकर, मान आमदार नागोजी गाणार, जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे, कार्यवाह निलेश काशीद, मोहनराव ओमासे, संजीव मांढरे, प्रमोद काकडे, कैलास करपे, राजेंद्र शहाणे, अरविंद गवळे, मावळचे कार्याध्यक्ष भारत काळे, रोहन पंडित, वशिष्ठ गटकुळ, गणेश पाटील, संजय हुलावळे, नारायण असवले, सोपान ठाकर, प्रवीणकुमार हुलावळे, तसेच रामहरी लोखंडे, महेश शेलार, राहुल तावरे, संजय लांडे, कैलास शिंदे यांच्यासह 200 हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.