Pimpri-Chinchwad : पोटच्या अल्पवयीन मुलाला व भाच्याला मोबाईल चोरी करायला लावणाऱ्या बापाला अटक

एमपीसी न्यूज वडिलांचे केवळ संपत्ती नाही तर वारश्याने संस्कार व गुण देखील जात असतात. मात्र मुळात याच विचाराला तडा जाईल अशी वागणूक एका बापाने केली आहे.(Pimpri-Chinchwad) त्याने चक्क आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलाला व भाच्याला मोबाईल चोरी शिकवली व त्याद्वारे त्याने हिंजवडी, वाकड परिसरात मुलांना मोबाईल चोरी करायला भाग पाडले. या अट्टल गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

सुरेश दगडू जगताप (वय 38 रा.कुसगाव, मावळ) असे अटक आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून आठ चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथक हिंजवडी- वाकड परिसरात गस्त घालत असताना आरोपीला पोलिसांनी वाकड स्माशान भूमी येथून अटक केली आहे, (Pimpri-Chinchwad) त्याला ताब्यात घेताच पोलिसांनी त्याच्याकडून 8 चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.

Pune News : पुणे विभागातील 60 रेल्वे मार्ग होणार जलद; वेगमर्यादा वाढवण्याचे काम अंतिम टप्प्यात

 

पोलीस तपासात आरोपीने सांगितले की, तो या चोरीसाठी त्याचा अल्पवयीन मुलगा व भाचा यांच्याकरवी चोरी करत होता. याप्रकऱणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी एकूण 65 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले आहेत.

हि कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत, (Pimpri-Chinchwad) पोलीस अंमलदार सुनिल कानगुडे, किरण काटकर विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, गणेश गिरीगोसावी, सुधीर डोळस. प्रदिप गायकवाड, प्रदिप गुट्टे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.