Chikhali: सासर्‍याने केला सुनेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – घरात दोघेच असताना 55 वर्षीय सासर्‍याने सुनेकडे शारीरिक संबंधाची मागणी करत विनयभंग केला. ही धक्कादायक घटना त्रिवेणीनगर येथे नुकतीच उघडकीस आली.

याप्रकरणी 27 वर्षीय सुनेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 55 वर्षीय सासर्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी वारंवार लगट करण्याचा प्रयत्न करत होता. शुक्रवारी घरात दोघेच असताना सासर्‍याने  सुनेला तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही. तर, तुम्हाला प्रॉपर्टीमधून काहीच देणार नाही, असे म्हणून विनयभंग केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.