Pune News : अंमली पदार्थाची विक्री करणार्‍या पिता-पुत्राला दहा वर्षाची शिक्षा

Pune News : अंमली पदार्थाची (हेरॉईन) विक्री करणार्‍या पिता-पुत्राला न्यायालयाने दहा वर्ष सक्षम कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.

नझीर अहमद मोहम्मद हजरत शेख (वय-66), अहमद नझीर शेख (34 दोघेही रा. मिलिंद नगर, मुंढवा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पिता पुत्राचे नाव आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान गुन्हा दाखल असलेले रफिक कादर बेग यांचा मृत्यु झाला.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक बाजीराव पाटील यांना माहीती मिळाली होती की, शेख पिता पुत्र त्यांच्या मुंढव्या येथील घरातच अंमली पदार्थाची विक्री करत असून रफिक बेग खरेदीसाठी येणार असल्याचे समजले होते.  त्यानुसार अंमली विरोधी पथकाने शेख पिता पुत्राच्या घरी छापा मारुन आरोपिंची आणि घराची छडती घेतली असता 1 किलो अंमली पदार्थ वजन काटा व मापे आढळून आली. याप्रकरणी आरोपिवर हडपसर पोलिस ठाण्यात 2 फेब्रुवारी 2009 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले. याप्रकरणात तीन साक्षिदारांची साक्ष नोदविण्यात आली. अगरवाल यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपिंना दहा वर्ष सक्षम कारावास प्रत्येकी 1 लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष सध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  न्यायालयीन कामकाजात हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार ए. एल. गायकवाड, सी. एस. जाधव यांनी मदत केली.

बचाव पक्षाच्या वतीने या शिक्षेला विरोध करण्यात आला. यावेळी बचाव पक्षाने अंमली पदार्थ विरोध पथकाने ज्या घरावर छापा टाकला ते घर शेख पिता पुत्राचे नव्हते असा बचाव केला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.