Bhosari News : कार भाडेतत्त्वावर घेऊन भाडे थकवत वडील आणि मुलं घर सोडून पसार

विश्वासघात केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दोन मुले आणि वडील अशा तिघांनी मिळून एका व्यक्तीची कार भाडेतत्त्वावर घेतली. त्याबाबतचा भाडे करारनामा देखील करून घेतला. मात्र आठ महिने उलटून गेल्यानंतर देखील कार मालकाला त्याची कार, ठरलेले भाडे दिले नाही. उलट कार भाड्याने घेणारे तिघेजण त्यांचे राहते घर सोडून गेले.

तसेच मोबाईल फोन देखील बंद करून ठेवले. याबाबत तिघांच्या विरोधात विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लांडेवाडी भोसरी येथे घडला.

मुकुंद गजानन ताजणे (वय 48, रा. दत्तनगर, दिघी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 12 जून) फिर्याद दिली आहे. त्यानुसार हार्दिक सोपानराव बेलेकर (वय 27), गौरव सोपानराव बेलेकर, सोपानराव बेलेकर (तिघे रा. शेलारवस्ती, देहू आळंदी रोड, चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर 2020 रोजी आरोपींनी फिर्यादी यांची टाटा कंपनीची झेस्ट गाडी (एम एच 14 / जी यु 2883) भाडेतत्त्वावर घेतली. तसेच याबाबतचा भाडे करारनामा देखील लांडेवाडी भोसरी येथे थोपटे वकील यांच्या कार्यालयात करण्यात आला.

भाडे करारनामा केल्यानंतर ठरल्याप्रमाणे आरोपींनी फिर्यादी यांना भाडे दिले नाही. तसेच त्यांची कार देखील परत दिली नाही.

त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपींना त्यांच्या राहत्या पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी तेथून रूम सोडून निघून गेल्याचे फिर्यादी यांना समजले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींच्या दोन मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र आरोपींसोबत संपर्क झाला नाही.

आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांची साख लाख दहा हजार रुपये किमतीची कार आणि 19 हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे एक लाख 14 हजार रुपये भाडे न देता फिर्यादी यांचा विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.