Pune : मराठा आरक्षणासाठी उद्यापासून बेमुदत चक्री उपोषण 

एमपीसी न्यूज – मराठा समाजास आरक्षण मिळावेआंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईत्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावीतसेच आंदोलकांवरील दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेतअशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे सोमवारपासून (२० ऑगस्ट) पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहेअशी माहिती मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक शांताराम कुंजीरतुषार काकडेबाळासाहेब आमराळेरेखा कोंडे आणि सचिन आडेकर यांनी दिली आहे. 

औरंगाबाद येथे मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाच्या समन्वयकांच्या ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत आंदोलनाबाबतची दिशा ठरविण्यात आली होती. त्याप्रमाणे २० ऑगस्टपासून दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे.

चक्री उपोषण आंदोलनात सहभागी होणार्‍यांसाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. आंदोलन शांततेनेसंयमाने व शिस्तीने करावेगालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नयेप्रक्षोभक व भडकावू घोषणा-भाषणे करू नयेआंदोलनादरम्यान झालेला कचरारिकाम्या बाटल्या कचरा पेटीत टाकाव्यातअनुचित प्रकार करणार्‍यांना रोखून पोलिसांच्या ताब्यात द्याअशी वर्तणूक ठेवून कार्यकर्त्यांनी बेमुदत चक्री उपोषणात सहभागी व्हावेअसे आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी केले आहे. मोर्चाच्या राज्य समन्वय समितीची औरंगाबादेत लवकरच बैठक होणार असून त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरेलअसेही सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.