Pune news : प्रतिबंधित पदार्थांचा सुमारे 1.55 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त

एमपीसी न्यूज : अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने शहरात लोहा नगर येथे प्रतिबंधित पदार्थांचा सुमारे 1.55 लाख रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे.यापुढेही प्रशासनाकडून प्रतिबंधित पदार्थांसंदर्भात धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचा इशारा पुणे विभागाचे सह आयुक्त अर्जुन भुजबळ यांनी दिला आहे.

अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने 28 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे शहरात लोहियानगर येथे धाड टाकून प्रतिबंधित पदार्थांचा सुमारे 1,55,874 रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. तो संबंधित पोलीस ठाण्यामध्ये  पोलिसांमध्ये भा.द.वि कलम 188, 272, 273, 328 सह असुमाका कलम  30( 2 अ) 26 (2)(i) व 26 (2)(iv) नुसार प्रथम खबरी अहवाल देण्याची कारवाई सुरू आहे.

समीर शेख यांच्या राहत्या घरी लोहियानगर, पुणे शहर या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई संजय राठोड, मंत्री, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार अभिमन्यू काळे (भा.प्र.से) आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन भुजबळ,(Pune News) सह आयुक्त (पुणे विभाग), पुणे यांच्या नेतृत्वात पुणे कार्यालयातील सहाय्यक आयुक्त साहेब देसाई व श्रीकांत करकळे आणि अन्न सुरक्षा अधिकारी बलाही शिंदे व सुप्रिया जगताप यांनी केली आहे.

PCMC News : स्थळदर्शक आणि मार्गदर्शक फलक लावा, नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

यापुढेही प्रशासनाकडून प्रतिबंधित पदार्थांसंदर्भात धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचा इशारा अर्जुन भुजबळ, सह आयुक्त (पुणे विभाग) पुणे यांनी दिला आहे.

यापूर्वी पुणे विभागात बऱ्याच ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ संदर्भात कारवाया करण्यात आले असून पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थांच्या व्यवसायिकांना (Pune News) अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थांची विक्री करू नये तसेच अन्न आणि/ किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.