BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कुटुंबावर संकट येण्याची भीती दाखवून नागरिकांना लुटणा-या दोन भोंदूबाबांना अटक

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – कुटुंबावर संकट येण्याची भीती दाखवून मंत्रशक्तीने उपाय करण्याचे सांगून नागरिकांना लुटणा-या दोन भोंदूबाबांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांच्या दक्षतेमुळे हे शक्य झाले.  

रवींद्र वसंत गंगावणे व समाधान तुकाराम वाकोडे (रा. जळोची बारामती), अशी अटक केलेल्या या भोंदूबाबांची नावे आहेत.

दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भोंदूबाबा हे स्वामी समर्थांचे सेवेकरी म्हणून दारोदारी भिक्षा मागतात. अशाच प्रकारे सोमवारी (दि.10)गणेशमळा सिंहगड येथे भिक्षा मागत असताना एका कुटुंबास भविष्य सांगून त्यांच्याकडून एक सुती दोरा मागून त्या दो-यास तोडून गाठ मारण्यास सांगितले. ती गाठ या भिक्षेकर-याने हातचालाखीने गायब करून त्या कुटुंबाच विश्वास संपादन केला. त्यानंतर दोघांनी कुटुंबावर खूप मोठे आरिष्ट येणार आहे, अशी भीती दाखविली. तसेच दैवी शक्ती व मंत्राच्या सहाय्याने उपाय करण्यासाठी दोघांकडून दोन हजार रुपये घेतले.

मात्र, सोसायटीतील इतर लोकांकडून भोंदूगिरी करून कटुंबावर संकट येण्याची भिती दाखवून त्यावर मंत्राद्वारे उपाय करण्यासाठी पैसे घेऊन लुबाडत असल्याचे समजले. त्यानंतोर तातडीने दत्तवाडी पोलिसांना कळवून दोघांना चौकीत आणले. तपासात भोंदुगिरी करून लुबाडत असल्याचे समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली.

दोघांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तवाडी पोलीस पुढील तपास करीत असून अशा प्रकारे भोंदुंना बळी पडू नका, असे करणारे इसम आढळून आल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

.