BNR-HDR-TOP-Mobile

Pune : महापालिकेसमोर वाहने चालविताना वाटतेय भीती; गंभीरपणे अपघात होण्याची शक्यता

0

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेसमोर वाहने चालविताना ‘पोटात गोळा’च उठतो. बसेसनी वळसा घेतल्यानंतर गंभीर अपघात होतो की काय अशी भीती वाटते.

सुमारे 200 ते 250 बसेस रोज महापालिकेसमोर विविध विभागात ये-जा करीत असतात. सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून पुणे महापालिकेची विस्तारित इमारत बांधण्यात आली. मात्र, या बसेस उभ्या करण्यासाठी महापालिकेने इतरत्र पुणे शहरात दुसरीकडे जागा देण्यात आली नाही. त्यामुळे या बसेस महापालिके समोरच उभ्या असतात. समोरच मेट्रोच्या कोट्यवधी रुपये किमतींच्या मशीनने खोदाई सुरू आहे.

‘खडखड’ आवाज करून मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. बसेस, चार चाकी वाहने, रिक्षा, दुचाकी कशाही पद्धतीने वळविण्यात येतात. त्यामुळे समोरून कोणते वाहन येणार आणि अपघात होणार, याची भीती आहे. सकाळी आणि संध्याकाळी तर दूरदूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3