Pune News : लॉकडाऊनच्या भीतीने कामगार परतीच्या दिशेने, गर्दीने रेल्वे स्थानक गजबजले

एमपीसी न्यूज : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली आहे. पाटील पुणे महानगर परिवहन महामंडळाची सेवादेखील बंद केली आहे. त्यानंतर जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंचे दुकान उघडी ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली असून उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

त्यामुळे येत्या काळात पूर्णपणे लॉकडाउन लागतो की काय अशी भीती निर्माण झाल्याने इतर राज्यातील कामगार पुन्हा आपापल्या गावाकडे परतत आहेत. परराज्यात जाणाऱ्या या कामगारांच्या गर्दीने पुणे रेल्वेस्थानक पुन्हा एकदा गजबजून गेले आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावरून बिहार उत्तर प्रदेश कडे जाणाऱ्या गाड्या भरून धावत आहेत. पोलीस स्थानकावर रात्री रवाना होणाऱ्या गाडीसाठी अगदी सकाळपासून अनेकजण स्थानक परिसरात ठाण मांडून बसलेले पाहायला मिळत आहे. भर उन्हात हे कामगार गाडीची वाट पाहताना दिसत आहे. कुठल्याही परिस्थितीत गावाला जायचे, गाडीत जागा मिळालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया या कुटुंबातील व्यक्तींची आहे.

रेल्वे स्थानकावर गर्दी करणाऱ्या या व्यक्ती प्रामुख्याने हॉटेल कामगार आणि बिगारी काम करणाऱ्या आहे. यातील काही नागरिकांना बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये आलो होतो. एका हॉटेल मध्ये कामही मिळाले होते. परंतु कोरोना वाढू लागल्यामुळे हॉटेल पुन्हा बंद करण्यात आले. त्यामुळे पुन्हा माझी नोकरी गेली. त्यामुळे नोकरी नसताना पुण्यात राहून काय करणार ? त्यामुळे मी आता पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे.. अशीच भावना रेल्वे स्थानकावर जमलेल्या बहुतांश नागरिकांची होती.

दरम्यान पुणे रेल्वे स्थानकावरून सध्या फक्त आरक्षित गाड्या धावत आहेत. या गाड्यातून कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे अनेक प्रवासी तिकीट न काढता किंवा वेटिंग चे तिकीट घेऊन प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवाशांना तुम्ही रेल्वे स्थानकावरून माघारी पाठवले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.