Chinchwad News : नाटक ‘अनलॉक’ झाले हो…!

उद्यापासून प्रत्येक रविवारी पिंपरी चिंचवडकरांसाठी प्रसिद्ध नाटकांची मेजवानी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडच्या नाट्य रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नाटक अनलॉक झाले असून चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात उद्या (रविवार, दि. 13) पासून प्रत्येक रविवारी प्रसिद्ध नाटकांची मेजवानी मिळणार आहे.

शासनाने नाट्यगृहातील नाट्यप्रयोगांना सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार चोखंदळ नाट्य रसिकांचे शहर असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. यामुळे नाट्यकर्मींसह नाट्यरसिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उद्या (रविवारी, दि. 13) सायंकाळी साडेसहा वाजता ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक होणार आहे. पुढील रविवारी (दि. 20) दुपारी बारा वाजता ‘मी सावरकर बोलतोय’ आणि सायंकाळी साडेसहा वाजता ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक होणार आहे.

नाट्यगृहातील एकूण मर्यादेच्या 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. त्या सर्व सूचनांचे पालन करूनच नाट्यप्रयोग होणार असल्याचे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज भूतकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.