Pimpri : आंतरराष्ट्रीय योगपटूंचा महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज –  आंतरराष्ट्रीय योगपटूंचा व योग साधकांचा महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

पुणे डिस्ट्रीक्ट योगा ऍण्ड फिटनेस इन्स्टिट्यूट या संस्थेच्या वतीने निगडीतील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात या सत्कार सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, भारतीय योग संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे आदी उपस्थित होते.

केरळ येथील आठव्या आशियन योग स्पर्धेतील सुशांत तरवडे व देवदत्त भारदे यांनी सुवर्ण पदक तर भारतीय संघाने आशियन चॅम्पीयन 2018 चषक मिळविल्याबद्दल योग संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत 12 देशातील 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

योग शिक्षक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 22 साधकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 28 योग शिक्षकांनी जानकी देवी बजाज संस्थेच्या सहाय्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 44 शाळांमध्ये 5 दिवस जावून दररोज एक तास योगाचे प्रशिक्षण दिले. 400 ते 500 विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थ्यांची प्रत्येक शाळेतून निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांची नोव्हेंबरमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहित संस्थेच्या अध्यक्षा अनिता गायकवाड यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता गोगावले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.