Talegaon : दिव्यांग लाभार्थींच्या वतीने आमदार बाळा भेगडे यांचा सत्कार

एमपीसी  न्यूज – संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. या दिव्यांग लाभार्थीच्यावतीने आमदार बाळा भेगडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती गुलाबा  म्हाळसकर, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष किरण राक्षे  आदी उपस्थित होते. 

यावेळी दिव्यांग असलेल्या व्यक्तींना 200 रुपयांनी वाढ करून 600 ऐवजी 800 रुपये तर 80 टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना 400 रुपयांनी वाढ करून 600 ऐवजी 1000 रुपयांचे प्रतिमाह अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील 5000 दिव्यांग लाभार्थींना याचा लाभ होणार आहे. मावळ तालुक्यातील  रोहिदास गायकवाड, विकास लिंभोरे, देविदास जांभूळकर, अनिल वाळूंज, दत्ता आंद्रे, मंगेश थोरवे, स्नेहलता कोल्हे, विजय लोहारी, कामिनी फुले, सुभाष शेडगे, सनी जव्हेरी, भिकाजी जाधव आदींनी सत्कार केला.

आमदार बाळा भेगडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालेले आहे. यावेळी आमदार बाळा भेगडे यांनी बोलताना सांगितले की, तालुक्यातील एकही दिव्यांग बांधव कुठल्याही शासकीय योजनेपासून वंचित ठेवणार नाही, तसेच शासकीय समित्या आणि लोकप्रतिनिधी यांच्यावतीने पुढील काळात जी शिबिर घेण्यात येतील त्या सर्व शिबिरामध्ये दिव्यांग बांधवाना घरपोच लाभ दिला जाईल असे सांगितले. यावेळी सभापती गुलाबा  म्हाळसकर, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष किरण राक्षे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन किरण राक्षे यांनी केले तर आभार राहुल कराळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.