Talegaon : कामगार कल्याण मंडळ केंद्राला मान्यता दिल्याबद्दल कामगार संघटनांकडून बाळा भेगडे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे कामगार कल्याण मंडळ केंद्रासाठी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी मान्यता दिली. याबद्दल त्यांच्या विश्वकमल या राहत्या घरी विविध कामगार संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी टाटा मोटर्स युनियन लीडर संजीव असवले, अर्जुन वारिंगे, अनिल कारंडे, महेश सरोदे, दामोदर गदादे,निलेश नाटक, यशवंत कदम (सरपंच), तसेच जनरल मोटर्स नवनाथ शेटे, संदीप भेगडे, मंगेश थोरात, UMW डाँग्सिनचे अध्यक्ष नितीन नखाते, बिरुदेव यादव, निलेश शेवकर, संदीप काळे, चेअरमन माऊली लिंभोरे, सुनील मामा इंगळे, भारत मोरे, तसेच KSB पंपचे महेंद्र असवले पाटील सर्व कामगार बंधूंनी राज्य मंत्री बाळा साहेब भेगडे यांचा एकत्रित सत्कार केला. याच बरोबर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

अनुलोम व तळेगाव एमआयडीसी युनियनकडून 28 मार्च 18 रोजी केंद्राची मागणी केली होती. यावेळी भेगडे यांनी 1500 स्क्वेअर फूटचा हॉल उपलब्ध करून ऑगस्टमध्ये केंद्र चालू करू, असे सांगितले. त्यानंतर अनुलोम मित्र अर्जुन वारिंगे यांनी गुणवंत कामगार पुरस्कार योजना गेली चार वर्ष बंद आहे, अशी सूचना केली. त्यावर जनरल मोटर्स नवनाथ शेटे यांनी मावळ कामगार संघटना स्थापन करून काम करू असे सांगितले. तर नगरसेवक सुभाष शिरसाट यांनी कामगार एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.