PimpleGurav : कराटे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार   

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथील आर. जे. स्पोर्टस अॅकॅडमीच्यावतीने कराटे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यर्थ्यांचा सत्कार समारंभ पिंपळे गुरव काशीद पार्क येथे आयोजित केला होता. या वेळी ४० पेक्षा अधिक मुलांना बेल्ट देण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये बहुजन समाजपक्षाचे शहराध्यक्ष सुशील गवळी, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, राजगृह धम्मविनय ट्रस्टच्या अध्यक्षा राजेश्री जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मुलांना कराटे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांना बेल्ट व प्रमाणपत्र देण्यात आले.  या कार्यक्रमाचे आयोजन आर जे स्पोर्टस अॅकॅडमीचे अध्यक्ष रोहित जाधव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.