Pimpri : विश्व विवेक फाऊंडेशनतर्फे रविवारी महापौर जाधव, पटवर्धन, खाडे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – विश्व विवेक फाऊंडेशन आणि पुणे शिकलगार समाजसेवा संघ, पुणे मल्याळी यांच्यातर्फे येत्या रविवारी (दि.21) महापौर राहुल जाधव, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर सचिन चिंचवडे यांचा सत्कार केला जाणार आहे. याबाबतची माहिती नगरसेवक बाबू नायर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 

आकुर्डीतील केरळ भवन येथे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा सत्कार समारंभ होणार आहे. खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष व आमदार बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, थरमॅक्सचे व्यवस्थापकीय संचालक एम. एस. ऊण्णीकृष्णन उपस्थित राहणार आहेत.

राहुल जाधव यांची शहराचे 25 वे महापौर म्हणून नुकतीच निवड झाली. भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच अॅड. सचिन पटवर्धन यांची राज्य लेखा समितीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. याबरोबरच उपमहापौर सचिन चिंचवडे, पुणे मल्याळम फेडरेशनचे अध्यक्ष के. हरिनारायण, ओरिसा राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कार विजेत्या तेजस्विनी अडिगे यांच्या सत्कार केला जाणार आहे.

विश्व विवेक फाऊंडेशनचे मोहनदास नायर, दिलीप नायर, पुणे शिकलगार समाजसेवा संघाचे अध्यक्ष सलीम शिकलगार, नाजीर शिकलगार, योगेश कदम, अभिजीत शिंदे यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.