Pune: बालगंधर्व येथील छायाचित्रांच्या प्रदर्शनातील विजेत्यांचा सत्कार सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 79 व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील वर्षभरातील घडामोडींचे विविध वृत्तपत्रातील छायाचित्रकांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत भरविण्यात आलेल्या विजेत्या छायाचित्रकारांचा सत्कार आज सोमवारी (दि.17) पुणे श्रमिक पत्रकार संघात करण्यात आला.
पुणेकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने हजेरी लावत छायाचित्रकांना भरभरून दाद दिली. दरवर्षी हे प्रदर्शन भरवले जाते. या प्रदर्शनातील छायाचित्रे पाहून पुण्यातील घडलेल्या चांगल्या वाईट घटना पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. प्रत्येक छायाचित्र एक कथा मांडणार होतं. आणि ते क्षण, ती घटना टिपणा-या छायाचित्रकांनी घेतलेली मेहनत देखील पाहता क्षणी लक्षात येत होती.
 प्रदर्शनातील विजेत्यांचा पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आदर सत्कार करण्यात आला.  संदीप घोडके (प्रथम क्रमांक), गजेंद्र कळसकर (द्वितीय क्रमांक), राहुल राऊत (तृतीय क्रमांक) आणि जिग्नेश मिस्री यांना उत्तेजनार्थ सत्कार करण्यात आला. तसेच छायाचित्र जर्नालिजम कोर्सचे विद्यार्थी वरूण कुमार(प्रथम क्रमांक), रोहन जावळे(द्वितीय क्रमांक), कृतार्थ देव (तृतीय क्रमांक) यांचा देखील सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.