Pimpri : वायसीएम रुग्णालयाच्या कचरा कुंडीत सापडले स्त्री जातीचे अर्भक

एमपीसी न्यूज – वायसीएम रुग्णालाच्या कचरा कुंडीमध्ये काही दिवसांचे जन्मलेले स्त्री जातीचे मृत अर्भक आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आले आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे पुरस्कार प्रदान सोहळा

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक महिला हॉस्पिटलच्या मागच्या गेटने परिसरात आली. तिने बाळ कचरायकुंडीत टाकले व पळून गेली. ती वायसीएममध्ये उपचार घेत नसल्याचेही उघडकीस आले आहे. अर्भक हे काही दिवसांचे असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तर दुसऱ्या बाजूला बाहेरून येवून कोणी असे अर्भक कचरा कुंडीत टाकून जात असल्याने पिंपरी-चिंचवड माहापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

Bhosri : खिशातला मोबाईल घेतला म्हणून तरुणावर जिवघेणा वार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.