Pimpri : महिला कॉंग्रेसच्यावतीने कौमार्य करणा-या एेश्वर्याचा सत्कार 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या कौमार्य  चाचणीला विरोध करणा-या मुलीचे एेश्वर्या  भाट-तमाईचीकर  हिचा नवरात्र उत्सवातील नवदुर्गा म्हणून आज  सत्कार करण्यात आला. 

पिंपरीतील महात्मा फुले पुतळ्याजवळ सत्कार  करण्यात आला. पिंपरीत माहेरी आल्यानंतर त्या सोमवारी भाटनगरमधील देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी दांडिया खेळत असलेल्या महिलांसोबत त्या देखील दांडिया खेळू लागल्या. परंतु मंडळाने त्या दांडिया असल्याचे पाहताच दांडिया खेळ बंद करत डी़जे सुरु केला.

हे जे धाडस एेश्वर्याने दाखविले. त्या तिच्या कर्तृत्वाला सलाम करीत तिचा सन्मान केला.   पिंपरी – चिंचवड महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरिजा कुदळे, प्रियदर्शनी सेलच्या अध्यक्षा विनिता तिवारी,  उपाध्यक्षा शोभा  मिरजकर, तृप्ती शिंदे आदी उपस्थित होते.  अन्यायाबद्दल आवाज उठविल्याबद्दल कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.