Chinchwad News : श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळातर्फे प्रकटदिन महोत्सव आयोजित

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील बकाऊ वूल्फ कॉलनी मध्ये स्वामी समर्थांच्या प्रकटदिनानिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवड यांचातर्फे (Chinchwad News) आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाचा प्रारंभ हा बुधवारी दि. 22 मार्च रोजी झाला होता. हा उत्सव 26 मार्च पर्यंत जल्लोषात साजरा होणार आहे.
स्वामी समर्थ सत्संग मंडळाने आयोजित केलेला हा 26 वा महोत्सव. या मठाची स्थापना ही 1997 मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी हा उत्सव होतो.
गुढीपाडव्याचा दिवशी उत्सवाची सुरुवात झाली. तर उत्सवाच्या पाच ही दिवस ‘श्रीं’ ची पूजा, आरती, महानैवेद्य या गोष्टी होणार आहेत. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, उत्सव कलश स्थापना, मंडप पूजा त्यावरून प्रसिद्ध पखवाज वादक पंडित श्री प्रताप पाटील (मुंबई) यांचा कार्यक्रम झाला.
Pune News : पुणे पोलिस शिपाई चालक पदाच्या पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा रविवारी
उत्सवाचा द्वितीय दिवशी ‘श्रीं’ चा धन्वंतरी अभिषेक झाला व भक्तांमार्फत लक्षावधी गायात्री जप ही करण्यात आले. उत्सवाच्या तृतीय दिवशी श्रीं’ चा फळांच्या रसाने अभिषेक होणार आहे.(Chinchwad News) संध्याकाळी फुलगाव चे स्वामी स्वरूपानंद हे येऊन ‘ भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ‘ या विषयावर प्रवचन देणार आहेत.
उत्सवाच्या चौथा दिवशी ‘श्रीं’ चा सुगंधी द्रव्याने अभिषेक व पूजा करण्यात येणार आहे. सायंकाळी गणेश महाराज गोंधळी यांचा भक्ती गायनाचा कार्यक्रम आहे. उत्सवाच्या पाचव्या दिवशी ‘श्रीं’ चा केशर दुधाने अभिषेक करण्यात येणार आहे. तर पाचव्या दिवशी सायंकाळी भक्ती गंधर्व चे श्री मुकुंद बादरायणी यांचा स्वर समर्थ अभंगवाणी कार्यक्रम असणार आहे. उत्सवाचे सर्व व्यवस्थापन अध्यक्ष दिनकर रामचंद्र चींचवडे, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे यांची खाली होत आहे.