Fatal Accident News : भरधाव बसच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या पादचारी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या बसच्या धडकेत रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 1) सकाळी सात वाजता सरदार चौक, स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण येथे घडला.

बाबू बसराज कोन्तल (वय 48, रा. राजेशिवाजी नगर, चिखली) असे मृत्यू व्यक्तीचे नाव आहे. याबाबत बाबू यांचे भाऊ हनुमंता बसराज कोन्तल (वय 39, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक केशव पांडुरंग पावडे (रा. पदमावती रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ बाबू बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पायी चालत कामावर जात होते. सरदार चौक, स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण येथे ते रस्ता ओलांडत असताना आरोपी चालवत असलेल्या भरधाव वेगातील बसने त्यांना जोरात धडक दिली. त्यात बाबू यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.