Ichalkaranji : फाय ग्रुपचे अध्यक्ष पंडितराव दाजी कुलकर्णी यांचे निधन

Fie Group President Panditrao Daji Kulkarni passed away

एमपीसी न्यूज – फाय ग्रुपचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष पंडितराव दाजी कुलकर्णी (वय 92) यांचे रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. फाय फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शहराचे नाव जगभर लौकिक केले.

पंडितराव दाजी कुलकर्णी “पंडित काका” या नावाने ते ओळखले जात. ​​​रावपंडित​ यांनी ​उद्योग समूहाच्या माध्यमातून इचलकरंजीचे नावलौकिक जगभर केले होते. फाय प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या उद्योगसमूहात सुमारे पंचवीस कंपन्या आहेत. जपानच्या केहींन या कंपनीबरोबर त्यांनी केहीन – फाय असा संयुक्त उद्योग प्रकल्प पुणे येथे सुरू केला. पंडीत काका यांनी विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल भारतीय व्यक्तींचा गौरव करण्याच्या हेतूने फाय फाउंडेशनची स्थापना केली.

फाय फौंडेशन पुरस्कार दर वर्षी इचलकरंजी येथे एका भव्य समारंभात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते दिले जातात. अभियांत्रिकी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानविकी, शिक्षण, कृषी, संगीत आणि कला, क्रीडा, साहित्य, बाल कलाकार आणि स्थानिक कला याक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गुरविण्यात येते. यातील सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रभूषण पुरस्कार या नावाने दिला जातो. 30 ते 40 वर्षे या पुरस्काराच्या माध्यमातून देशभरातील अनेक विविध क्षेत्रातील नामांकिताना या ठिकाणी त्यांनी पुरस्कार दिले.

पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, अभिनेते दिलीप कुमार, उद्योगपती राहुल बजाज उपस्थित राहिले होते. फाउंडेशन च्या माध्यमातून देशातील अनेक आपत्तीच्या वेळी मोठा निधी त्यांनी शासनाला व विविध संस्था कडे सुपूर्द केला होता. लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मानही त्यांनी पहिल्यांदा या शहरात मिळवला होता.

काल त्यांना त्रास झाल्यामुळे कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.