एमपीसी न्यूज : सध्या कतारमध्ये बहुचर्चित फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup 2022) सुरू आहे. जगभराचे लक्ष या वर्ल्ड कप कडे लागलेले आहे. आजपासून नॉक आऊटच्या मॅचेस सुरू होत आहेत. अंतीम सामना 18 डिसेंबर रोजी रंगणार आहे.
फायनलमध्ये पोहोचण्याच्या स्पर्धेमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात गेल्या काही दिवसांत काय काय घडले हे थोडक्यात समजून घेऊ-
• शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात कॅमेरूनकडून 1-0 असा पराभव पत्करावा लागला तरीही ब्राझीलने गटात अव्वल स्थान पटकावले.
• स्वित्झर्लंडने सर्बियाचा 3-2 असा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम 16 मध्ये प्रवेश केला.
• उरुग्वेने घानाचा 2-0 ने पराभव केला परंतु दक्षिण कोरिया आणि पोर्तुगाल एच गटातून पुढे गेल्याने बाद फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत.
• पोर्तुगालवर दणदणीत विजय मिळवून दक्षिण कोरियाने कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या 16व्या फेरीत प्रवेश केला आहे.
• आशियाई संघाने युरोपियन संघाचा 2-1 असा पराभव केला.
Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे येथे दोन दिवसीय कॅरम स्पर्धेचे आयोजन
आणि अशा रीतीने नॉक आऊट म्हणजेच राऊंड ऑफ 16 मध्ये पोहोचलेले 16 संघ पुढीलप्रमाणे-
FIFA World Cup 2022: राऊंड ऑफ 16 पर्यंत पोहोचलेल्या संघांची यादी (List of teams that have progressed to Round of 16)
1. नेदरलँड
2. यूएसए
3. अर्जेंटिना
4. ऑस्ट्रेलिया
5. फ्रान्स
6. पोलंड
7. इंग्लंड
8. सेनेगल
9. जपान
10. क्रोएशिया
11. ब्राझील
12. दक्षिण कोरिया
13. मोरोक्को
14. स्पेन
15. पोर्तुगाल
16. स्वित्झर्लंड