Fight against Corona: पीएम केअर्स निधीतून दिले जाणार Made in India 50,000 व्हेंटीलेटर

Fight against Corona: Made in India 50,000 ventilators to be provided from PM Cares fund स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी महाराष्ट्राला 181 कोटी रुपये मिळणार आहेत.

एमपीसी न्यूज – पीएम केअर्स फंड ट्रस्टने Made in India अर्थात भारतात निर्मित होणाऱ्या 50 हजार व्हेंटीलेटरच्या पुरवठ्यासाठी 2000 कोटी रुपये निर्धारित केले असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सरकारी कोविड रुग्णालयांना  हे व्हेंटीलेटर पुरवण्यात येणार आहेत तसेच स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी 1000 कोटी रुपये  निर्धारित करण्यात आले आहेत.

या 50 हजार व्हेंटीलेटरपैकी 30 हजार व्हेंटीलेटरची निर्मिती भारत इलेक्ट्रोनिक्समधे करण्यात येत आहे. उर्वरित 20 हजार व्हेंटीलेटर पैकी एग्वा हेल्थ केअर 10 हजार, एएमटीझेड बेसिक 5,650, एएमटीझेड हाय एन्ड 4 हजार, अलाईड मेडिकल 350 व्हेंटीलेटर तयार करत आहे.

आतापर्यंत 2923 व्हेंटीलेटरची निर्मिती झाली असून त्यापैकी 1340 व्हेंटीलेटरचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राला 275, दिल्ली 275, गुजरात 175, बिहार 100, कर्नाटक 90, तर राजस्थानला 75 व्हेंटीलेटर पुरवण्यात आले. 2020 जून अखेरपर्यंत आणखी 14 हजार व्हेंटीलेटर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येतील.

स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी महाराष्ट्राला 181 कोटी रुपये

तसेच स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 1000 कोटी रुपये आधीच जारी करण्यात आले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसारच्या लोकसंख्येसाठी 50% भार, कोविड-19 पॉझीटीव्ह प्रकरणांच्या संख्येसाठी 40%  आणि सर्व राज्ये, केंद्र शासित प्र्देशांना समान रूपाने 10 %  या आधारे निधीचे वितरण करण्यात आले आहे.

स्थलांतरीतांच्या निवारा, अन्न, वैद्यकीय उपचार आणि प्रवास यासाठी या सहाय्याचा उपयोग करावयाचा आहे. निधी प्राप्त करणाऱ्या प्रमुख राज्यांमधे महाराष्ट्र 181 कोटी, उत्तर प्रदेश 103 कोटी, तामिळनाडू 83 कोटी, गुजरात 66 कोटी, दिल्ली 55 कोटी, पश्चिम बंगाल 53 कोटी, बिहार 51 कोटी, मध्य प्रदेश 50 कोटी, राजस्थान 50 कोटी आणि कर्नाटक 34 कोटी यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.