Pune News : दुकानांसमोर ट्रक उभा करण्यावरून दुकानदारांमध्ये हाणामारी

एक जण गंभीर तर तिघांना अटक

एमपीसी न्यूज : दुकानासमोर ट्रक उभा करण्यावरून दुकानदार मध्ये झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. पुण्याच्या धानोरी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन मध्ये मोहन अग्रवाल यांनी फिर्याद दिली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. सुनील हरिराम वर्मा, सुभाष हरीराम वर्मा आणि पचित काशीराम वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी मोहन अग्रवाल आणि त्याच्या भावाचे मेणबत्ती आणि अगरबत्ती बनविण्याचे शेड आहे. त्यांच्या शेजारी वर्मा ग्लासेस चे मालक वर्मा यांचा कारखाना आहे. वर्मा यांचा माल घेऊन 28 ऑक्टोबर रोजी एक ट्रक आला होता आणि तो ट्रक अग्रवाल यांच्या शेड समोर उभा होता.
दरम्यान अग्रवाल यांचा माल घेऊन एक ट्रक त्या ठिकाणी आला होता. त्यामुळे फिर्यादीचे भाऊ धरमपाल यांनी वर्मा यांच्याकडे जाऊन त्याच्या मुलाचा ट्रक पुढे घेण्यास सांगितला. परंतु वर्मा ट्रक काढण्यास तयार नव्हते. यावरून त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी आरोपी अजित वर्माने लाकडी फळी धर्मपाल यांच्या डोक्यात मारली. हा घाव वर्मी बसल्याने धर्मपाल गंभीर जखमी झाले आहेत. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटकही केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.