Pimpri : पूर्ववैमनस्यातून पिंपरीत दोन गटात तुंबळ राडा

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपरीगाव येथे घडली. 

राहुल टोनपे आणि त्याचा एक साथीदार अशी जखमी झालेल्यांची नावे आहे. ज्ञानेश्वर कापसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
_MPC_DIR_MPU_II
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी राहुल आणि पिंपरी गावातील पवनेश्वर टी स्टॉलचे मालक ज्ञानेश्वर कापसे यांच्यात यापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक खटके उडाले. त्यानंतर दोघांनीही आपल्या मित्रांना फोन करून बोलावून घेत एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळातच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी ज्ञानेश्वर कापसे याला ताब्यात घेतले आहे. जखमी राहुल आणि ज्ञानेश्वर या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
दरम्यान, मिलिंद नगर पिंपरी आणि नाशिक फाटा कासारवाडी येथे आणखी दोन मारामारीच्या घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये देखील दोनजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.