Chinchwad News : पथनाट्य राहिले बाजूला तेथे भरले भांडण नाट्य

एमपीसी न्यूज  – पथनाट्यासाठी आलेल्या दोन ग्रुपमध्ये (Chinchwad News) किरकोळ कारणावरून भांडणे झाली ज्यामुळे पथनाट्य राहिले बाजूला लोकांना भांडणे पहायला मिळाली. ही घटना ही घटना मंगळवारी (दि. 31) सकाळी चिंचवड येथे.

याप्रकरणी देवानंद बाळासाहेब शिंदे (वय 31, रा. धायरी पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश मिजार आणि अनिकेत राजेशिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangavi News : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या कार चालकावर गुन्हा

पोलीस अंमलदार समीना मोमीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे आणि आरोपी हे एकाच ठिकाणी काम करतात. त्यांनी आरोग्य विभागाकडून जनजागृती साठी (Chinchwad News) पथनाट्याचे काम घेतले होते. मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते भीमनगर चिंचवड येथे पथनाट्य सादर करण्यासाठी आले.

दरम्यान ते जवळच असलेल्या चहाच्या दुकानात चहा पीत होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्या वादातून आरोपी उमेश याने शिंदे यांच्या डोक्यात मेगाफोन मारला. तर अनिकेत याने लाकडी दांडग्याने मारून शिंदे यांना जखमी गेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.