Dehuroad Crime News : कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहन प्रवेश शुल्क न भरता, तलवार दाखवत गार्डशी हुज्जत ; चालकाला अटक

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहन प्रवेश शुल्क न भरता पळून जाणा-या कर्नाटकातील चालकांना तलवार दाखवत गार्डशी हुज्जत घातली. याप्रकरणी चालकाने  देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (दि.21) सकाळी साडे सहाच्या सुमारास निगडी वाहन प्रवेश परवाना शुल्क केंद्रावर हा प्रकार घडला. 

जितेंद्र सिंग प्रतापसिंग राजपूत (रा. खानापूर, बेळगाव, कर्नाटक) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुखदेव शांताराम राऊत (वय 49, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र सिंग हा वाहन शुल्क न भरता पळून जात होता. त्यावेळी निगडी केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून शुल्क भरण्याची विनंती केली. मात्र, आरोपीने तलवार दाखवत गार्डशी हुज्जत घातली व शिवीगाळ केली असे फिर्यादीत म्हटले आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.