Talegaon Dabhade News : रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ठेकेदारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्ता दुरुस्त करण्याच्या नावाखाली रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदून अपघातांची भीषणता वाढवली. याप्रकरणी रस्त्याच्या ठेकेदार कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहनलाल मथराणी कन्स्ट्रक्शन प्रा ली या कंपनीचे चंदन मोहनलाल मथराणी (वय 52), सुरेंद्र चंदन मथराणी (वय 22) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीचे उपाध्यक्ष दिलीप डोळस यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांची तळेगाव-चाकण महामार्ग कृती समिती महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी काम करते. तळेगाव-चाकण मार्गावर वडगाव चौक ते सुधा पूल या सहा किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम मोहनलाल मथराणी कन्स्ट्रक्शन प्रा ली या कंपनीला देण्यात आले आहे.

मागील पाच महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण, सेवा रस्त्याच्या पट्ट्या भरणे यासाठी रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदण्यात आले आहेत. यामुळे अपघातांची भीषणता वाढली आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत भारतीय दंड विधान कलम 336, 431 नुसार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी चंदन मथराणी आणि सुरेंद्र मथराणी यांना अटक केली आहे. त्यांना वडगाव न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलीस नाईक गिरीगोसावी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.