Pune News : पुण्यातील व्यावसायिकाकडे पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : हडपसर परिसरातील एका सिगारेट, बडीशेप, गोळ्या, बिडी विकणाऱ्या व्यावसायिकाकडे तब्बल पाच लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या एका पत्रकार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार शिरसाट असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका 32 वर्षाच्या व्यावसायिकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचे गांधी चौकात दुकान आहे. फिर्यादी यांचा चालक सिगारेट, बिडी, गोळ्या, बडीशेप असा माल घेऊन टेम्पोतुन जात होता. यावेळी स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्या शिरसाट यांनी हा टेम्पोअडवला, टेम्पो ची चावी काढून घेतली. हे टेम्पो चालकाने फिर्यादी यांना सांगितले. त्यानंतर फिर्यादीला फोन करून तुमच्या टेम्पोमध्ये सिगारेट, बिडी विकता. तुम्ही मला पाच लाख रुपये द्या. जर हे पैसे दिले नाही तर तुम्हाला जड जाईल तुमच्यावर केस करावी लागेल अशी धमकी दिली.

दरम्यान यानंतर टेम्पो चालकाने आरोपीकडे चावी मागितली असता शिरसाट याने त्याला खलास करण्याची धमकी देऊन डोक्यात काचेची बाटली मारली आणि टेम्पोची पुढील काच फोडली. यामध्ये टेम्पो चालक जखमी झाला आहे. दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी यांनी हडपसर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी संबंधित पत्रकार विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.