Pune News : मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : मिलिंद एकबोटे यांच्यावर जातीय तेढ निर्माण होईल असे वक्त्यव्य केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी कोंढवा पोलिस स्‍टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

मिलिंद रमाकांत एकबोटे (समस्‍त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष) यांनी जाणीवपुवर्क व हेतुपुरस्करपणे बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवून मनुष्य हानी आणी वित्त हानी करण्याच्या उददेशाने व हेतुने लोकांना एकत्र संघटीत केले.

गैरमार्गाने बेकायदेशीररित्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछुट, बेताल वक्तव्य करुन एका विशिष्‍ठ धर्माविरुध्द बदनामी केली. सदरील भाषणाचे चित्रिकरण करुन ते सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारीत केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्‍याची माहिती ॲड तोसिफ शेख यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.