Dighi News : दोन महिलांचा ऑनलाईन माध्यमातून पाठलाग करत बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका अनोळखी व्यक्तीने दोन महिलांचा ऑनलाईन माध्यमातून पाठलाग केला. महिलांचे फोटो आणि चित्रफीत अपलोड करून त्यांची बदनामी केली. हा प्रकार ऑक्टोबर 2021 ते 24 मे 2022 या कालावधीत च-होली बुद्रुक येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या खोट्या मेल आयडी तयार करून त्यावरून फिर्यादी महिलेचा त्याने पाठलाग केला. फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीचे फोटो आणि चलचित्र अपलोड करून त्याखाली अश्लील मेसेज लिहून ते नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याच्या उद्देशाने व्हायरल केले. फिर्यादी यांच्या बद्दलची चुकीची माहिती तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.