Pune News : इंस्टाग्रामवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : सोशल मीडियावर गंमत म्हणून किंवा कळत नकळत अश्लील व्हिडिओ अथवा फोटो अपलोड करत असाल तर सावधान व्हा ! कारण अशा प्रकारच्या फोटो अथवा व्हिडिओ मुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. लहान मुलांचे फोटो अथवा व्हिडिओ अपलोड केल्यास थेट चाईल्ड पॉर्नोग्राफीचे गुन्हे दाखल होऊ शकतात.

पुणे पोलिसांनी अशा प्रकारे इंस्टाग्राम अकाउंट वरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शैलेश शर्मा (रा कोंढवा, पिसोळी रोड) याने त्याच्या मोबाईलद्वारे फेसबुक अकाउंट वरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत अर्जुन वानबा वाघमारे (रा.कात्रज कोंढवा रोड) याने त्याच्या मोबाईल द्वारे इंस्टाग्राम अकाउंट वरून लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ अपलोड केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी फिर्याद दिली असून त्यात दोघांवरही कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.