Talegaon Crime News : मायमर हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – मायमर हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात तळेगाव दाभाडे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेऊन मृतदेहाची अप्रतिष्ठा केली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मावळचे शिवसेना खाजदार श्रीरंग बारणे यांनी उघडकीस आणला होता. तसेच शुक्रवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हॉस्पिटल विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. पवार यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुधीर गणेश लोके (वय 26, रा. मळवली, मावळ, मुळगाव – कणकवली, सिंधुदुर्ग) यांनी शुक्रवारी (दि.07) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मायमर हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
_MPC_DIR_MPU_II
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल गणेश शंकर लोके (वय 40) यांचा 01 मे रोजी मायमर हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला. उपचाराचे बिल भरु शकले नाही म्हणून मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेऊन मृतदेहाची अप्रतिष्ठा केली असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हॉस्पिटल प्रशासकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.