Vadgaon Maval : मावळ तालुका व जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरा : अतुल राऊत 

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ पंचायत समिती मावळ व पुणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरावी याबाबतची मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष अतुल राऊत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ  भगवान पवार व तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांना निवेदनाद्वारे केली आहे. 

माहितीसाठी निवेदनाच्या प्रती, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री डाॅ राजेश टोपे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे, पुणे जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर आदींना देण्यात आल्या आहेत.

यावेळी अतुल राऊतसह ओबीसी सेल मावळ प्रभारी मंगेश खैरे, मावळ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, सचिन कुंभार, वडगाव शहर अध्यक्ष मयुर गुरव, विकास कंद, अभिजीत काळोखे, रुपेश सोनुने,अवधुत गायकवाड, केदार धोंगडे उपस्थित होते.

राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष्यमान भारत केंद्रातील डॉक्टर, आरोग्यसेवक,आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, शिपाई  हे सर्व कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत.

कोरोनाच्या या संकटात देखील जीवाची पर्वा न करता सेवा करीत असलेल्या या सर्व कोविड योध्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले आहे.

हे काम करत असताना या सर्व यंत्रणेवर मनुष्यबळ कमी असल्याने अतिरिक्त ताण येत आहे. सर्व गोरगरीब जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी येथील शासनामार्फत लवकरात लवकर येथील सर्व शासकिय व अशासकिय रिक्त पदे भरण्यात यावी अशी विनंती ही निवेदनात राऊत यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.