‘इंडियाज मोस्ट बॉम्बड मॅन’ एम एस बिट्टा यांच्या जीवन कहाणीवर लवकरच चित्रपट

एमपीसी न्यूज- एम एस बिट्टा आणि बॉम्ब यांचं जणू काही जुनं नातं आहे. ते भलेही एक शीख असले तरी सगळ्यात आधी ते भारतीय आहेत. ते केवळ एक देशभक्त नसून ते असे भारतीय आहेत ज्यांनी आपल्या देशाच्या सुरक्षतेसाठी 15 वेळा आपल्या अंगावर बॉम्ब हल्ले झेलले होते. त्यांच्या आयुष्याच्या हा प्रवास दाखवण्यासाठी ‘जिंदा शहीद’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.

त्यांच्या या प्रवासावर चित्रपट काढण्यासाठी बरेच निर्माते आणि निर्देशक उत्सुक आहेत. अखेर शैलेंद्र सिंग आणि प्रिया गुप्ता ही प्रसिद्ध जोडी एम एस बिट्टा यांच्या प्रवासावर ‘जिंदा शहीद’ नावाचा चित्रपट बनवणार आहेत. ज्याची शूटिंग 2020 च्या पहिल्या 6 महिन्यांच्या आत सुरु होणार आहे. यावर ते सध्या प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसोबत चर्चा करत आहेत आणि लवकरच याची घोषणा केली जाईल.

वयाच्या 6 व्या वर्षापासूनच एम एस बिट्टा यांना आपल्या देशासाठीच प्रेम जाणवत होत. जेव्हा 1983 मध्ये त्यांनी सुवर्ण मंदिरावर भारतीय ध्वज फडकवला त्यावेळी त्यांच्यावर पहिल्यांदा बॉम्ब हल्ला झाला. जर त्यांनी भारतीय ध्वज सुवर्ण मंदिरावर फडकवला तर त्यांना बॉम्बने उडवण्यात येईल अशी धमकी आतंकवादी भिंद्रनवाले याने दिली होती. ते राजकारणात हि होते आणि त्यानंतर त्यांनी त्याहून काढता पाय घेतला. त्यानंतर त्यांनी आतंकवाद्यांना शिक्षा देणे, शहिद झालेल्यांच्या परिवारांना त्यांचा अधिकार मिळवून देणे आणि राजनैतिक आतंकवादी यासारख्या लढाईंनाच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले होते.

चित्रपट संबंधी बोलताना निर्माते शैलेंद्र सिंग म्हणतात, “एम एस बिट्टा ही एक जिवंत कथाच आहे’. एक असा सच्चा देशभक्त ज्याचा प्रवास देशभरातील 60 कोटी युवकांना प्रेरित करेल. मी एम एस बिट्टा यांचा मनापासून आभारी आहे कि त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून त्यांच्या जीवनाची ही कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी आम्हाला दिली. मला असं वाटतंय की हा चित्रपट बॉलीवूडसाठी नक्कीच गमे चेंजर ठरेल.

चित्रपटाच्या निर्मात्या प्रिया गुप्ता यांनी या चित्रपट संबंधी बोलताना असे म्हंटले आहे, “एम एस बिट्टा यांचं जीवन लोकांसाठी एक जिवंत उदाहरण आहे. तुमच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला त्यासाठी वर्दी किंवा खुर्चीची गरज लागत नाही. त्या शिवाय सुद्धा तुम्ही देशाची सेवा करू शकता. भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस या महान नेत्यांना आपण पाहिलेलं तर नाही आहे. त्यांच्या जीवनाच्या कथांमुळे आपण त्यांना ओळखतो. तर त्याहून वेगळं म्हणजे एम एस बिट्टा हे एक जिवंत शहीद आहेत. त्यांचं जीवन वास्तविक रित्या प्रेरणादायी आहे. आणि आम्ही स्वतःला खूपच भाग्यवान समजतो की आम्हाला त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची संधी मिळत आहे आणि त्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत”

शैलेंद्र सिंग एक प्रसिद्ध स्टोरी टेलर पैकी एक आहेत. त्यांनी आजवर 72 अवॉर्ड विंनिंग फिचर फिल्म बनवले आहेत. तर 2000 जाहिरातींच्या कंसेप्ट्स तयार केल्या आहेत. ते एक बेस्ट सेल्लिंग लेखक, फिचर फिल्म आणि शॉर्ट फिल्म च्या जगातले सर्वात नावाजलेले निर्माते आहेत. नुकताच त्यांनी ग्लोबल डान्स चॅम्पिअन्स किंग्स युनाइटेडच्या आयुष्याच्या कथेचे अधिकार मिळवले आहेत. प्रिया गुप्ता एक प्रतिष्ठित मार्केटिंग आणि एंटरटेनमेंट प्रोफेशनल आहेत. आणि त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या एंटरटेनमेंट सप्प्लिमेंट मुंबई टाइम्ससाठी नॅशनल मॅनेजिंग एडिटर च्या जागी काम सांभाळले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.