गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Film elections : चित्रपट महामंळाच्या निवडणुकीत पत्रकार शरद लोणकर यांची उडी

एमपीसी न्यूज : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंळाच्या आजी, माजी संचालक मंडळात गेली सात वर्षाचा वाद धगधगताच असताना, या निवडणुकीत राजकीय पार्ट्या सहभागी होतील का? (Film elections) आजी माजी संचालकांचे किती पॅनल होतील याकडे सभासदांचे लक्ष लागलेले असताना निवडणुकीच्या रिंगणात आपली पहिली अपक्ष उमेदवारी सलाम पुणे चे अध्यक्ष ,पत्रकार शरद लोणकर यांनी घेतली आहे.

महामंडळाच्या निवडणूकीचा कार्यक्रम  धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर होणार आहे . दोन गटात होणारे आरोप प्रत्यारोप गेली सात वर्षे होत आहेत. प्रसिद्धी  विभागातून पुण्यातील पत्रकार आणि सलाम पुणे या संस्थेचे अध्यक्ष शरद लोणकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. याच सोबत त्यांनी आपला संक्षिप्त जाहीरनामाही आज माध्यमांना पाठविला आहे.

Moshi workshop : कवितेसाठी मन संवेदनशिल आणि निरीक्षण करणारे असावे -कवी वादळकार

जाहिरनाम्यात सांगितल्यानुसार, मराठी सिनेसृष्टी आणि सिंगल स्क्रीन थियेटर सह एक्स्ट्रा आर्टिस्ट,तंत्रज्ञ यांना गतवैभव -सुवर्ण काळ लाभावा या साठी अनेक योजना-प्रकल्प राबविण्याची गरज आहे,  त्या  आपण सादर करून त्याचा पाठपुरावा करणार.ज्यामुळे थियेटर आणि मराठी सिनमापासून दूर चाललेला रसिक पुन्हा उत्सुकतेने गर्दी करू लागेल . आणि एकूणच या व्यवसायातील प्रत्येकाला प्रतिष्ठा ,वैभव लाभू शकेल.(Film elections) या क्षेत्रात पैसा लावणाऱ्या निर्मात्यापासून ते गरीब तंत्रज्ञा पर्यंत अनेकांची आर्थिक पिळवणूक होते. कोणाला व्यसनाधीन करून  तर कोणाला आमिषे दाखवून लुटले जाते .प्रसिद्धी आणि मार्केटिंग च्या नावाखाली होणाऱ्या अमाप फसवणुकीला पायबंद घालणे .

मुंबई,कोल्हापूर ,पुणे या सारख्या ठिकाणी ज्यांची ऐपत नाही अशा सिनेसृष्टीतील गोरगरीब तंत्रज्ञ ,एक्स्ट्रा आर्टिस्ट यांच्या साठी शासकीय मदतीने स्वस्तात गृहप्रकल्पांची उभारणी करणे.(Film elections) मुंबईतील फिल्म सिटी मध्ये महाराष्ट्रातून कामासाठी येणाऱ्या प्रत्येक फिल्मी कलावंत-कामगारासाठी किमान 400 जण राहू शकतील असे अत्यल्प दरात वसतिगृह उभारणे, असे प्रकल्प ते राबवणार आहेत.

 

 

 

Latest news
Related news