Film Review : ‘जिंदगी खत्म नही होती, जिंदगी चलती रहती है’

'इज लव्ह इनफ ? सर' सिनेमाचा रिव्हिव्ह; विधवा मोलकरीणीच्या प्रेमाची गोष्ट

एमपीसी न्यूज – प्रेमाच्या अनेक गोष्टी नानाविध पद्धतीने सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर आल्या आहेत. सिनेमा आपल्याला बरचं काही शिकवून जात असतो. रोहेना गेरा यांनी दिग्दर्शित केलेला ‘इज लव्ह इनफ ? सर’ हा सिनेमा असाच वेगळ्या धाटनीचा आणि बरचं काही शिकवून जाणारा आहे.

वयाच्या 19 व्या वर्षी विधवा झालेल्या महिलेनं एका घरात तात्पुरत्या काळासाठी मोलकरणीचं काम सुरू केलं. या मोलकरणीचं नाव रत्ना (तिलोत्मा शोम) आहे. विधवा असल्याने समाजाची तथाकथित बंधन तिच्यावर आहेतच. पण, तिला घरी मदत करत स्वत:च्या स्वप्नांना साकार करायचं आहे. रत्नाला फॅशन डिझाईनिंगमध्ये करिअर करायचे आहे. या बद्दल ती आपल्या घरमालकाला देखील सांगते.

रत्नाचा घरमालक अश्विन (विवेक गोंबर) हा तरूण लेखक आहे. मुळातच श्रीमंत आसलेला अश्विनच लग्न मोडल्यामुळे तो न्यूयॉर्कमधून परत भारतात आला आहे. अश्विनचे खाण्यापिण्यावर लक्ष नाही, तो कायम निराश राहत असतो, या गोष्टी रत्नाला पटत नाहीत.

तिच्या कामात ती कोणतीच कचुराई करत नाही. अशावेळी ती अश्विनला आपली हकिकत सांगते. यावेळी रत्ना म्हणते, ‘जिंदगी खत्म नही होती, जिंदगी चलती रहती है’,. यानंतर अश्विनच्या मनात रत्ना बद्दल, तिच्या स्वप्ना बद्दल आपुलकी निर्माण होतो. तो तिच्याकडे आकर्षित व्हायला लागतो.

‘क्लास डिफरन्स’ या विषयाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न गेरा यांनी या चित्रपटात केला आहे. नावानेच हाक मारावी असा आग्रह धरणा-या अश्विनला रत्ना नेहमी ‘सर’ म्हणूनच हाक मारत असते.

प्रेम, आदर आणि स्वाभिमान हे अभिनयाच्या भाषेतून रंगवायला दोघेही कुठेच कमी पडत नाहीत. कसलीच अश्लिलता आणि ओंगळवाणे वाटावे, असे संवाद नाहित. सिनेमा हळुवार तुमच्या मनात उतरतो आणि कळत नकळत काही प्रश्न देखील विचारतो.

बरं रत्नाचं स्वप्न साकार होत का नाही ? अश्विनचं पुढं काय होत ? चित्रपटाचा शेवट काय ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला ‘इज लव्ह इनफ ? सर’ हा सिनेमा ‘नेटफिक्स’वर जाऊन पहवा लागेल. शेवटी ‘जिंदगी खत्म नही होती, जिंदगी चलती रहती है’ हे रत्नाचे वाक्य तुमच्याही मनात कुठेतरी घर करेल एवढं निश्चित.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.